Tue, Sep 29, 2026
राजकीय बातमीपत्र

चांदवडीच्या उपसरपंचपदी संतोष शिंदे बिनविरोध; मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते सत्कार

चांदवडीच्या उपसरपंचपदी संतोष शिंदे बिनविरोध; मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते सत्कार
Ashok Ithape
  • PublishedSeptember 28, 2026

उपसरपंच संतोष शिंदे यांचा मंत्री मकरंद आबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार; गावच्या विकासकामांना गती देण्याचे आदेश

भुईंज : प्रतिनिधी

चांदवडी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित युवा उपसरपंचपदी श्री. संतोष जनार्दन शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. श्री. मकरंद आबा पाटील तसेच सातारा जिल्ह्याचे खासदार मा. श्री. नितीनकाका पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने चांदवडी गावच्या विविध प्रलंबित विकासकामांबाबतही सविस्तर चर्चा झाली.

मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते संतोष शिंदे यांचा पुष्पगुच्छ, मायेची शाल व कंदी पेढा भरवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर खासदार नितीनकाका पाटील यांच्या निवासस्थानीही संतोष शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पेढा भरवून गौरव करण्यात आला.

या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच फरीदा अहमद शेख, सौ. रेखा संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल अमोल शिंदे, यमुना सर्जेराव काकडे, माजी उपसरपंच गुलाबराव पांडुरंग शिंदे यांच्यासह गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश पाटलू शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत सखाराम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मोरे, संतोष आनंदराव शिंदे, राजेंद्र किसन शिंदे, रफिक चाचा शेख, रमेश शंकर शिंदे, अशोक अण्णा काकडे, अनिल भाऊ जाधव, नंदू पोळ, सुधाकर जी. काकडे, अरविंद दादा काकडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावच्या विकासकामांसाठी ग्रामस्थांची कैफियत

सत्कार सोहळ्यानंतर चांदवडी ग्रामस्थांनी मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी गावातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून विकासकामांच्या मागण्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने—

  • सार्वजनिक पाण्याची विहीर मंजूर करणे.
  • गावाची मोजणी करून गावठाण हद्द कायम करणे.
  • गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे करणे.
  • बंदिस्त गटर व पाईपलाईनची सुविधा उपलब्ध करून देणे.

या मागण्यांची मंत्री महोदयांनी गांभीर्याने दखल घेत ग्रामस्थांची कैफियत ऐकून घेतली.

अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश

ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांवर मंत्री मकरंद आबा पाटील यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सार्वजनिक विहीर, गाव मोजणी, रस्ते तसेच गटर-पाईपलाईनच्या प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले.

मंत्री महोदयांनी दाखविलेल्या सकारात्मक व तत्पर भूमिकेबद्दल चांदवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. नवनिर्वाचित उपसरपंच संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गावातील विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!