Sat, Nov 28, 2026
सातारा जिल्हा

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
Ashok Ithape
  • PublishedNovember 25, 2026

सातारा दि २५ – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रीतिसंगम कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला आणि देशाला विकासाचा मार्ग दाखविला आहे. स्व. अजित पवार यांनी नेहमीच स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचारानुसार आपली वाटचाल ठेवली. शासनही त्यांच्या विकासाच्या विचारावर वाटचाल करत आहे.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, विधान परिषद आमदार हर्षदा देशमुख, शशिकांत शिंदे, विधानसभा सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!