Wed, Jul 22, 2026
सामाजिक

“आपले विद्यार्थी, आपली जबाबदारी”चा आदर्श; नगरसेवक सचिन सावंत यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

“आपले विद्यार्थी, आपली जबाबदारी”चा आदर्श; नगरसेवक सचिन सावंत यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप
Ashok Ithape
  • PublishedJune 29, 2026

सोनगिरवाडीत शालेय बॅग, वह्या व पाणी बाटल्यांचे वितरण; उपक्रम दरवर्षी राबविण्याची घोषणा, मान्यवरांकडून कौतुक

वाई | प्रतिनिधी : सोनगिरवाडी प्रभागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी वाई नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सावंत यांनी राबविलेला मोफत शालेय साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रम नुकताच उत्साहात पार पडला. सोनगिरवाडी येथील ज्योतिबा मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या आणि पाणी बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास वाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अनिल सावंत, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष डॉ. सतीश बाबर, नगरसेविका सौ. नूतन मालुसरे, सौ. दिपाली सावंत, सौ. सरिता सावंत, सौ. तेजल सावंत, सौ. दिपाली श्रीकांत सावंत, युवा नेते श्रीकांत सावंत, सागर शिंदे, सागर पवार, प्रकाश जाधव, लक्ष्मण सावंत, अर्जुन मगर, गणेश पवार, किरण भोसले, दस्तगीर बागवान, पत्रकार अतुल संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, पोलिस उपनिरीक्षक अमोल गवळी आणि जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे यांनी आपल्या मनोगतात नगरसेवक सचिन सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. युवा नेते श्रीकांत सावंत यांनी विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

प्रास्ताविकात नगरसेवक सचिन सावंत यांनी हा उपक्रम दरवर्षी नियमितपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सौ. तेजल सावंत यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले, तर अशोक येवले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“आपले विद्यार्थी, आपली जबाबदारी” या भावनेतून नगरसेवक सचिन सावंत यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली शालेय साहित्याची मदत समाजासाठी प्रेरणादायी आहे. शिक्षणाला हातभार लावणारा हा पुढाकार निश्चितच प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी काढले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!