Thu, Jul 23, 2026
सामाजिक

रक्तदानाचा विक्रम! माजी उपसरपंच अक्षय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त ९३६ रक्तदात्यांचा अभूतपूर्व सहभाग

रक्तदानाचा विक्रम! माजी उपसरपंच अक्षय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त ९३६ रक्तदात्यांचा अभूतपूर्व सहभाग
Ashok Ithape
  • PublishedJune 29, 2026

रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू व लकी ड्रॉ; समाजसेवेचा आदर्श ठरलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

न-हे, दि. २७ : न-हे गावचे माजी उपसरपंच तथा युवानेते अक्षय सुभाष इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल ९३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले.

या शिबिरात न-हे परिसरातील नागरिकांसह पुण्याबाहेरील अकलूज येथूनही अक्षय इंगळे यांच्यावर प्रेम करणारे मित्र व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना अक्षय इंगळे म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, प्रत्येक रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबविला जातो.”

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास पिण्याच्या पाण्याचा जार, छत्री आणि तुळशीचे रोप भेट म्हणून देण्यात आले. तसेच रक्तदात्यांचा गौरव करण्यासाठी संसारोपयोगी वस्तूंचा भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, वॉशिंग मशीन, कुलर, ओव्हन आणि मिक्सर यांसारखी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.

या कार्यक्रमाला नागरिक, महिला वर्ग, मित्रपरिवार, जय गणेश मित्र मंडळ तसेच ओम नमः शिवाय प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत कृनाल इंगळे आणि सुभाष इंगळे यांनी केले.

समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबिराचे परिसरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक कार्याचा आदर्श म्हणून या उपक्रमाची प्रशंसा केली जात आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!