Fri, Jun 19, 2026
साहित्य

साहित्यिक डॉ. जनार्दन भोसले यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार प्रदान

साहित्यिक डॉ. जनार्दन भोसले यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार प्रदान
Ashok Ithape
  • PublishedJune 15, 2026

२३ राज्यस्तरीय, २ राष्ट्रीय व ३ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित साहित्यिकाच्या कार्याचा गौरव; वाई येथे पार पडलेल्या ५ व्या राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलनात पुरस्कार वितरण

वाई, दि. १२ : बावधन (ता. वाई) येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. जनार्दन पांडुरंग भोसले यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

के. एस. आय. पब्लिकेशन संस्था व विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयात ७ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलनात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. भोसले यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल साहित्यिक, समीक्षक व रसिक वाचकांनी घेतली आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आतापर्यंत २३ राज्यस्तरीय, २ राष्ट्रीय आणि ३ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

या सोहळ्याला संमेलनाध्यक्ष नागनाथ श्रीपती डोलारे, उद्घाटक विलास धोंडीराम खरात, स्वागताध्यक्ष शशिकांत कोचळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कवी सरकार विलास पाटील, मार्गदर्शक डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील तसेच लक्ष्यतारा न्यूज चॅनेलचे संपादक सचिन विष्णू वाघमारे यांसह अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोकण, गोवा, मराठवाडा, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर व कोल्हापूर आदी भागांतून आलेले साहित्यिक, कवी, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार प्रदान करण्यासाठी अजित नलगे, बाळकृष्ण राजपुरे आणि आप्पा भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विद्या थोरात-काळे आणि दिपक पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पुरस्कारप्राप्त साहित्यिक, कवी, पत्रकार आणि रसिक श्रोत्यांचे आयोजकांनी आभार मानून संमेलनाची सांगता केली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!