Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा

शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार

शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार
Ashok Ithape
  • PublishedJune 12, 2026

सातारा, दि.12:  शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर आज शहापूर ता. कराड  येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

यावेळी आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओमकार कापले, गटशिक्षणाधिकारी प्रताप पाटील यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी शहीद जवान अर्जुन जाधव  यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

यानंतर  वीर पत्नी  सायली, मुलगा  सर्वेश, वीर पिता  राजेंद्र, वीर माता  सुरेखा, भाऊ  ऋषिकेश, बहिणी  रेश्मा   चव्हाण   पूनम   पाटील  यांनी अंतिम दर्शन घेतले. यानंतर
शहीद अर्जुन जाधव  यांच्या पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!