ज्येष्ठ स्नेही प्रतापराव भाऊ पुस्तकाचे १९ मे रोजी प्रकाशन
![]()
जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रतापराव भोसले यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त किसन वीर महाविद्यालयात समारंभ
वाई दि. १८ : जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त “ज्येष्ठ स्नेही प्रतापराव भाऊ” या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि. १९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता किसन वीर महाविद्यालय, वाई येथील सभागृह मध्ये होणार आहे.
या पुस्तकाचे लेखक श्री. अनिल जोशी असून पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे माजी विधानपरिषद सदस्य मा. श्री. उल्हासदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. विजय कुवळेकर राहणार आहेत.
कार्यक्रमास जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून निमंत्रक म्हणून जनता शिक्षण संस्था, वाईचे सचिव डॉ. जयवंत चौधरी तसेच किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फणसे आहेत.
स्वर्गीय प्रतापराव भोसले यांच्या कार्याचा गौरव व स्मृती जागविणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





















