वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे वाईत व्याख्यान; वसंत व्याख्यानमालेचा २१ मे रोजी समारोप
![]()
“समाज आणि नैतिकता, आजची वास्तवता” विषयावर मार्गदर्शन; महागणपती घाटावर कार्यक्रम
वाई दि. १८ : तुकाराम मुंढे हे लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोप कार्यक्रमासाठी २१ मे रोजी वाई येथे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या समारोप कार्यक्रमात ते “समाज आणि नैतिकता, आजची वास्तवता” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर हे असणार आहेत. हे व्याख्यान नेहमीप्रमाणे महागणपती घाट येथे होणार असून, पावसाची शक्यता असल्यास कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.
या व्याख्यानासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, सचिव भद्रेश भाटे तसेच वसंत व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा सौ. तनुजा इनामदार यांनी केले आहे.





















