Sat, Sep 5, 2026
अभिष्टचिंतन

देगावच्या विकासाचा ध्यास घेणारे हरहुन्नरी नेतृत्व : श्री. रामदासशेठ इथापे यांना अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

देगावच्या विकासाचा ध्यास घेणारे हरहुन्नरी नेतृत्व : श्री. रामदासशेठ इथापे यांना अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
Ashok Ithape
  • PublishedMay 11, 2026

सामाजिक बांधिलकी, सहकारातील नेतृत्व, उद्योगक्षेत्रातील यश आणि देगावच्या विकासाचा अखंड ध्यास जपणाऱ्या श्री. रामदासशेठ इथापे यांना अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.

वाई : देगाव गावाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे, मदतीचा हात आणि मायेची साथ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. रामदासशेठ इथापे. राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या रामदासशेठ यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा होत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी कायम निष्ठेने कार्य केले आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून गावाच्या आणि समाजाच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे.

यशराम मसाले प्रा. लि. कंपनीचे सर्वेसर्वा उद्योजक म्हणून त्यांनी उद्योग क्षेत्रात यश संपादन केले, तर किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि., भुईंजचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या नेतृत्वामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत त्यांनी समाजकार्यालाही प्राधान्य दिले आहे.
देगाव गावाचा विकास, गावातील पायाभूत सुविधा, सामाजिक एकोपा आणि नव्या पिढीला दिशा देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

प्रसंगी कणखर भूमिका घेणारे, तर गरजूंना मायेची ऊब देणारे रामदासशेठ हे गावासाठी केवळ नेतृत्व नसून विश्वासाचे केंद्र बनले आहेत.
सतत विकासाचा ध्यास, कार्यकर्त्यांप्रती आत्मीयता आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या बळावर त्यांनी जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

अशा या कर्तृत्ववान, प्रेमळ आणि दूरदृष्टी असलेल्या श्री. रामदासशेठ इथापे यांना अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशाची अखंड भरभराट लाभो, हीच सदिच्छा.

संकल्प माध्यम समूह तर्फे श्री. रामदासशेठ इथापे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! समाजकारण, सहकार, उद्योग आणि गावविकासाच्या माध्यमातून आपण केलेले कार्य असेच प्रेरणादायी राहो. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि यशाची अखंड साथ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. देगावसह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी आपले नेतृत्व असेच भक्कम राहो, हीच सदिच्छा.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!