खेळ, उद्योग आणि कर्तृत्वाचा संगम; धावडीत ‘धावडीरत्न’ गौरव सोहळा उत्साहात संपन्न
![]()
उद्योजक चंद्रकांत मांढरे यांना जीवनगौरव; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, ‘चॅम्पियन्स इलेव्हन’ ठरला विजेता
वाई, प्रतिनिधी : धावडी येथे आयोजित धावडी प्रीमियर लीग (DPL) क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात गावातील उद्योजक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘धावडीरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आरोग्यदूत मिलिंद शिंदे व कृषितज्ज्ञ अरुण आदलिंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी उद्योजक चंद्रकांत मांढरे (बापू) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सतीश मांढरे, राजेंद्र मांढरे, प्रमोद मांढरे, अनिल मांढरे, प्रशांत मांढरे, सौ. संगीता मांढरे, संजय अशोक मांढरे, सागर विश्वास मांढरे, अतुल धुमाळ, रुपेश खंडागळे, सोमनाथ क्षीरसागर, संतोष शिंदे, डॉ. पूजा मांढरे आणि ऋषिकेश पवार यांना ‘धावडीरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्पर्धेत ‘चॅम्पियन्स इलेव्हन’ (संघमालक सागर प्रमोद मांढरे) संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ‘सचिन फायटर्स’ (संघमालक सचिन बापूराव मांढरे) द्वितीय, तर ‘मोरया इलेव्हन’ (संघमालक जितेंद्र भगवान मांढरे) तृतीय क्रमांकावर राहिले. समीर कोंढाळकर (उत्कृष्ट क्षेत्ररक्षक), अमित शिंदे (उत्कृष्ट फलंदाज), अविष्कार कांबळे (उत्कृष्ट गोलंदाज) आणि प्रणव कांबळे (मॅन ऑफ द सिरीज) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे मिलिंद शिंदे यांनी धावडी गावातील उद्योजकांचे कौतुक करत, त्यांच्या कष्ट व जिद्दीमुळे गावाचा लौकिक वाढत असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात अरुण आदलिंगे यांनी सुवासिक बासमती भातासाठी प्रसिद्ध असलेल्या धावडी गावात उद्योजकांचा होत असलेला सन्मान हा प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच वनिता ननावरे, उपसरपंच पल्लवी मांढरे, ग्रामपंचायत सदस्य सीमा मांढरे, महेंद्र गंगावणे, गणेश भानुदास मांढरे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश मांढरे, जितेंद्र मांढरे, सागर मांढरे, सचिन मांढरे, नितीन माने, अनिल मांढरे, प्रशांत मांढरे आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला व खेळाडू उपस्थित होते.
पुरस्कार सोहळ्यात सन्मानित व्यक्तींची चित्रफीत सादर करण्यात आली. पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येक मान्यवराला वृक्षरोप देऊन पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अशोक येवले व दीप्ती साळुंखे यांच्या सुरेल गीतांनी वातावरण रंगले.





















