Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

आरोग्य

पनीर म्हणून चीज ॲनालॉग विक्री केल्यास कठोर कारवाई

पनीर म्हणून चीज ॲनालॉग विक्री केल्यास कठोर कारवाई
Ashok Ithape
  • PublishedMay 5, 2026

सातारा दि.5- काही हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक तसेच केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेते आपल्या आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ तयार करताना पनीर ऐवजी पनीर सदृश्य “चीज ॲनालॉग” चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पनीर व चीज ॲनालॉग हे दोन्हीही दिसायला जरी एकसारखे असले तरी ते दोन्हीही अन्न पदार्थ वेगवेगळे असून प्रत्येकाचे पोषणमूल्य हे वेगवेगळे आहे. परंतु त्याबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. अशा हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक तसेच केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांवर कारवाई घेण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व उत्पादकांनी त्यांच्या विक्री बिलामध्ये ते विक्री करत असलेल्या अन्न पदार्थाचा स्वयंस्पष्ट उल्लेख करावा. पनीर व चीज ॲनालॉग पदार्थांची विक्री करताना लेबलवर्णन असलेल्या पॅकबंद पाकीटातूनच करावी तसेच हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक तसेच केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेते यांनी त्यांचे आस्थापनेमध्ये वापर केल्या जाणाऱ्या पनीर अथवा चीज ॲनालॉग यांचा उल्लेख मेन्यूकार्ड व डिस्प्ले बोर्डवर करणे बंधनकारक करण्याचे निर्देश मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडून देण्यात आलेले आहेत. सर्व हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक तसेच केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेते त्याचबरोबर पनीर व चीज ॲनालॉग यांचे उत्पादक यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन काटेकोरपणे न केल्यास अशावर कठोर कारवाईचे करण्यात येईल, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!