Fri, Apr 17, 2026
सातारा जिल्हा

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ashok Ithape
  • PublishedApril 13, 2026

सातारा दि.१२-गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना खूप उपयोगी आहे. या योजनेची व्याप्ती राज्यात वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरणातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे याचा शुभारंभ

दरे तालुका महाबळेश्वर येथे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवन संरक्षक अमोल सातपुते, वाईचे प्रांताधिकारी डॉ, योगेश खरमाटे, सातारचे प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उन्हाळ्यामध्ये धरणाची पाणी पातळी कमी होते. पाणी पातळी कमी झाल्यामुळे धरणातील गाळ काढल्यानंतर पाण्याची क्षमता ही वाढते व गाळाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो. यामुळे शेती अधिक सुपीक व कृषी उत्पन्न जास्त देते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी फार महत्त्वाची आहे.
तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धरणांमधील व तलावांमधील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकावा व आपली शेत जमीन जमीन सुपीक करून कृषी उत्पन्न वाढवावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!