श्री योगी राजुनाथ महाराज यांना श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर आखाड्यावर नियुक्ती
पुणे : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील श्री योगी राजुनाथ महाराज यांना श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर आखाड्यावर नियुक्ती करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय सप्तऋषि अखाड़ा
योगी राजूनाथ महाराज यांची राष्ट्रीय अध्यक्ष महामंडलेश्वर श्री सच्चिदानंद बालप्रभु जी महाराज यांनी श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर ही उपाधि देण्यात आली आहे.
सप्त ऋषि आखाड़ा परिषद सनातन धर्माच्या प्रति असलेली निष्ठा, सेवा आणि भक्ती पाहून,सनातन धर्म आणि संस्कृतिला पुढे नेण्यासाठी प्राचीन ऋषी परंपरा अबाधित ठेवण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदिपुरुष सेवार्थ ट्रस्ट, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष -अखंड श्री संत महासभा भारत, राष्ट्रीय प्रचारक – श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीदल, सदस्य – केंद्रिय संसदिय बोर्ड (PM Modi Mission For Nation), अध्यक्ष – महाराष्ट्र, संत सभा प्रकोष्ट, राष्ट्रीय हिंदू महासभा भारत (रजि),भगवा शक्ती परिषद प्रांत महानायक महाराष्ट्र,सरचिटणीस,वंदे मातरम् संघटना महाराष्ट्र,अध्यक्ष महाराष्ट्र भारत नवनिर्माण युवा स्वयंसेवक दल,अध्यक्ष महाराष्ट्र – ‘भगवा फोर्स, एकराष्ट्र ‘भक्तदल, महाजनादेश संदेशक, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्कप्रमुख आदी संस्थेवर ते कार्यरत आहेत.













