Tue, Mar 3, 2026
राजकीय बातमीपत्र

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी बाळसाहेब उर्फ राजेश पिसाळ, तर ओबीसी संघटना वाई तालुकाअध्यक्षपदी अरविंद काका कुदळे यांची निवड

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी बाळसाहेब उर्फ राजेश पिसाळ, तर ओबीसी संघटना वाई तालुकाअध्यक्षपदी अरविंद काका कुदळे यांची निवड
Ashok Ithape
  • PublishedOctober 29, 2024

बावधन l प्रतिनिधी : वाई तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळसाहेब उर्फ राजेश पिसाळ यांची निवड करण्यात आली.

खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत आ.मकरंद पाटील यांनी या निवडीचे पत्र पिसाळ यांना प्रदान केले.यावेळी बोलताना आ.मकरंद पाटील म्हणाले,बाळासाहेब पिसाळ यांच्याकडे तरूणाई ची ताकद आहे,सढळ हाताने त्यांनी लोकांना मदत केली आहे.अजित पवार यांच्यामुळेच आपण किसनवीर कारखाना वाचवू शकलो.

नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पिसाळ म्हणाले,सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करू.या पदाला न्याय देण्यासाठी जीवाच रान करू असेही पिसाळ यांनी स्पष्ट केले.

या निवडीबद्दल पिसाळ यांचे खा.नितीन पाटील,आ.मकरंद पाटील कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे,संचालक दत्तानाना ढमाळ,दिलीपराव पिसाळ,लक्ष्मणराव पिसाळ शहाजी पिसाळ,सरपंच सौ मनीषा फरांदे,माजी सरपंच सौ स्वाती कुदळे,
संतोष पिसाळ,संजय पिसाळ,बाळासाहेब कुदळे शंकरराव फरांदे,किसन नेवसे, यांच्यासह ग्रामस्थानी अभिनंदन केले.

वाई तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी संघटना वाई तालुकाध्यक्षपदी उद्योजक अरविंद काका कुदळे यांची निवड करण्यात आली.

आ.मकरंद पाटील यांनी खा नितीन पाटील यांच्या उपस्थितीत या निवडीचे पत्र अरविंदकाकांना प्रदान केले.
यावेळी बोलताना आ.मकरंद पाटील म्हणाले,अरविंद काकांनी मोठ्या कष्टाने उद्योजक म्हणून आपला नावलौकिक वाढविला आहे.सामाजिक कार्यातही काकांचा मोठा वावर होता,सढळ हाताने त्यांनी लोकांना मदत केली आहे.स्व.लक्ष्मणराव पाटील यांचे घनिष्ठ मित्र सहकर अशीच काकांची आजवरची ओळख आहे.त्यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा केली नव्हती.ओबीसी तालुकाध्यक्ष या पदामुळे काकांना लोकांना अधिकच वेळ देता येईल, त्यांच्या समाजकार्यात यामुळे व्यापकता येईल.

अरविंद कुदळे म्हणाले,सर्वांना बरोबर घेऊन जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करू.या पदामूळे मला आणखी वेगाने काम करता येईल.मकरंद आबांना मोठे मताधिक्य देणे हेच आमच्या संघटनेचे ध्येय असेल.

या निवडीबद्दल काकांचे खा.नितीन पाटील,कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे,संचालक दत्तानाना ढमाळ,दिलीपराव पिसाळ,लक्ष्मणराव पिसाळ शहाजी पिसाळ, संतोष पिसाळ,संजय पिसाळ,बाळासाहेब कुदळे,नितीन पिसाळ,संदीप ढवळे, दादासो पिसाळ, शंकरराव फरांदे,किसन नेवसे,सरपंच सौ मनीषा फरांदे व माजी सरपंच सौ स्वाती कुदळे यांच्यासह ग्रामस्थानी अभिनंदन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!