Sat, Nov 28, 2026
सातारा जिल्हा

सातारा पोलीस दलातील ४६ अंमलदारांना पदोन्नती

सातारा पोलीस दलातील ४६ अंमलदारांना पदोन्नती
Ashok Ithape
  • PublishedNovember 1, 2026

२४ जण श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, ११ जण सहायक पोलीस उपनिरीक्षक, तर ११ जण पोलीस हवालदारपदी पदोन्नत

सातारा : प्रतिनिधी l सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांसाठी आनंदाची बातमी असून, तब्बल ४६ अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये २४ सहायक पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी, तर ११ पोलीस नाईक व पोलीस शिपायांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी शासन निर्णय आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केली. पदोन्नती मिळाल्याने संबंधित पोलीस अंमलदारांच्या सेवेत नवी जबाबदारी आणि कामाची नवी संधी निर्माण झाली आहे.

गृहविभागाच्या २५ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश तसेच अपर पोलीस महासंचालक (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि पदोन्नती सुकाणू समितीच्या विहित अटींच्या अधीन राहून २४ सहायक पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली.

त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाच्या ७ मे २०२१ आणि १ ऑगस्ट २०२१ रोजीच्या शासन निर्णयांतील निर्देशांनुसार ११ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी, तर ११ पोलीस नाईक व पोलीस शिपायांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली.

या पदोन्नतीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) कृष्णकुमार जाधव यांनी सर्व पदोन्नतीप्राप्त पोलीस अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेले २४ अंमलदार

१) अफसर इमाम इनामदार
२) प्रकाश व्यंकटराव माने
३) आनंदराव मधुकर भोईटे
४) नंदकुमार लक्ष्मन घाटगे
५) रविकांत श्रीपतराव ढाणे
६) महेश पांडुरंग कदम
७) दिपक महादेव जाधव
८) मनोहर काशिनाथ सुर्वे
९) हिमेश गंगाराम माने
१०) संजय शिवरात साबळे
११) संजय यशवंत जाधव
१२) सुनिल भिकु गायकवाड
१३) तानाजी शांताराम घोरपडे
१४) प्रकाश विश्वनाथ कदम
१५) महेश दत्तात्रय कमाने
१६) रविंद्र काशिनाथ कदम
१७) प्रविण प्रतापराव शिंदे
१८) उज्वला लालसिंग कुंभार
१९) कांतीलाल चिमाजीराव नवघणे
२०) जनार्दन रामचंद्र खंडाळे
२१) संजय राजाराम चव्हाण
२२) संजय बबन मदने
२३) दिपक बाळासाहेब बर्गे
२४) संजय वामन सपकाळ

सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेले ११ अंमलदार

१) आनंदा विठ्ठल कदम (पोलीस हवालदार ब.नं. १५७)
२) दत्तात्रय दादा लोखंडे (पोलीस हवालदार ब.नं. १७७८)
३) काकासाहेब विश्वास पाटील (पोलीस हवालदार ब.नं. १९२५)
४) संतोष सखाराम शिंदे (पोलीस हवालदार ब.नं. ५६१)
५) प्रतिभा गजानन कर्पे (पोलीस हवालदार ब.नं. २०९६)
६) रियाज कादर शेख (पोलीस हवालदार ब.नं. ७६३)
७) सचिन प्रकाशराव देशमुख (पोलीस हवालदार ब.नं. ७३७)
८) महादेव यशवंत घाडगे (पोलीस हवालदार ब.नं. १४१०)
९) प्रविण नारायण चव्हाण (पोलीस हवालदार ब.नं. २२५)
१०) मल्हारी आनंदा भिसे (पोलीस हवालदार ब.नं. १७४३)
११) दादासो हनुमंत यादव (पोलीस हवालदार ब.नं. ९७८)

पोलीस हवालदारपदी पदोन्नती झालेले ११ अंमलदार

१) संदिप आप्पासो जाधव (पोलीस नाईक ब.नं. १८५०)
२) हेमंतकुमार नेताजी ढाणे (पोलीस शिपाई ब.नं. २४१५)
३) संदिप शिवाजी इंगळे (पोलीस शिपाई ब.नं. १०४१)
४) ज्ञानेश्वर अर्जुन टिंगरे (पोलीस शिपाई ब.नं. २१२६)
५) राकेश लालासाहेब घाडगे (पोलीस शिपाई ब.नं. २०७५)
६) अनिलकुमार दादासाहेब खाडे (पोलीस शिपाई ब.नं. ८४७)
७) सागर शिवाजी रासकर (पोलीस शिपाई ब.नं. १२७१)
८) संदिप शंकर फणसे (पोलीस शिपाई ब.नं. २२१५)
९) सुधीर मुरलीधर वाघमारे (पोलीस शिपाई ब.नं. १३७८)
१०) बाळकृष्ण रमेश नष्टे (चालक पोलीस नाईक ब.नं. १५५९)
११) दत्तात्रय एकनाथ धायगुडे (चालक पोलीस नाईक ब.नं. १७३७)

अशा प्रकारे सातारा जिल्हा पोलीस दलातील एकूण ४६ पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाली असून, या पदोन्नतीमुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!