Tue, Jul 21, 2026
यशोगाथा

एम.डी. (मेडिसिन)मध्ये राज्यात चमकदार यश; डॉ. दिव्या धुमाळ यांना सुवर्णपदक

एम.डी. (मेडिसिन)मध्ये राज्यात चमकदार यश; डॉ. दिव्या धुमाळ यांना सुवर्णपदक
Ashok Ithape
  • PublishedJuly 15, 2026

कृष्णा विश्व विद्यापीठात प्रथम क्रमांकासह यू.एस. व्ही. पुरस्काराचा मान; वाईच्या कन्येच्या यशाने तालुक्याची मान उंचावली

वाई | प्रतिनिधी : कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल, कराड येथे झालेल्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या निकालात वाई येथील अॅड. दिनेश धुमाळ व अॅड. विद्या धुमाळ यांच्या कन्या डॉ. दिव्या दिनेश धुमाळ यांनी एम.डी. (मेडिसिन) या विषयात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकाविले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा यू.एस. व्ही. पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.

यापूर्वी एम.बी.बी.एस. पदवी यशस्वीरीत्या संपादन केलेल्या डॉ. दिव्या धुमाळ यांनी पदव्युत्तर शिक्षणातही आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे वाई तालुक्याच्या शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डॉ. दिव्या धुमाळ यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या उज्ज्वल भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

यावेळी अॅड. अथर्व (भैय्या) पाटील मित्रपरिवार, वाई तसेच अॅड. ऋषिकेश (बंटी) सकुंडे मित्रपरिवार, भाजीमंडई, वाई यांच्या वतीने डॉ. दिव्या धुमाळ यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!