“Speak English with Confidence” — आता इंग्रजी शिकणे झाले अधिक सोपे!
![]()
ज्ञानसंकल्प डिजिटल ज्ञानपीठचा इंग्रजी Grammar व Spoken English उपक्रम; विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, नोकरदार आणि गृहिणींसाठी सुवर्णसंधी, इंग्रजी आत्मविश्वासाने शिकण्याचा नवा मार्ग!
वाई, प्रतिनिधी : आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, मुलाखती तसेच दैनंदिन संवादात प्रभावी इंग्रजीचा वापर आवश्यक असल्याने अनेकांना इंग्रजी शिकण्याची इच्छा असते. मात्र Grammar ची भीती, इंग्रजी बोलताना होणारा संकोच आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेक जण मागे पडतात.
याच पार्श्वभूमीवर ज्ञान संकल्प डिजिटल ज्ञानपीठ, वाई यांच्या माध्यमातून English Grammar & Spoken English हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात इंग्रजी भाषा सोप्या, प्रभावी आणि व्यवहार्य पद्धतीने शिकविण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती, नोकरदार, व्यावसायिक तसेच गृहिणींसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
इंग्रजीतील आत्मविश्वास वाढविणे, योग्य उच्चार, प्रभावी संवादकौशल्य आणि व्याकरणाची भक्कम पायाभरणी यावर विशेष लक्ष दिले जाणार असून, प्रत्येकाला सहज समजेल अशा पद्धतीने अध्यापन केले जाणार आहे.
इंग्रजी ही केवळ एक भाषा नसून उज्ज्वल भविष्याकडे जाणारा मार्ग आहे. त्यामुळे इंग्रजी शिकण्याची इच्छा असलेल्या सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञान संकल्प डिजिटल ज्ञानपीठच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रा. रामचंद्र खोपटीकर सरांचे विशेष मार्गदर्शन
इंग्रजी विषय अध्यापनाचा तब्बल ४० वर्षांचा समृद्ध अनुभव लाभलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. रामचंद्र खोपटीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा English Grammar & Spoken English उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून सोप्या, प्रभावी आणि व्यवहार्य पद्धतीने इंग्रजी शिकविणे ही त्यांची अध्यापनशैली आहे. व्याकरणातील भक्कम पाया, अचूक उच्चार, प्रभावी संभाषण कौशल्य आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
संपर्क : 9975746835 / 9561462878 / 9960600952
पत्ता : किसन वीर कॉलेज रोड, गांधी पेट्रोल पंपासमोर, दत्तनगर, वाई.





















