Tue, Jul 21, 2026
क्राईम न्यूज

चेन्नईतील ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी भुईंज पोलिसांच्या जाळ्यात; आनेवाडी टोलनाक्यावर अटक

चेन्नईतील ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी भुईंज पोलिसांच्या जाळ्यात; आनेवाडी टोलनाक्यावर अटक
Ashok Ithape
  • PublishedJune 25, 2026

तमिळनाडू पोलिसांना हवा असलेला NDPS गुन्ह्यातील आरोपी सातारा-पुणे मार्गावर ताब्यात; पुढील तपासासाठी चेन्नई पोलिसांकडे सुपूर्द

भुईंज, दि. २५ : तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथील ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीला भुईंज पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत आनेवाडी टोलनाक्यावर ताब्यात घेतले. संबंधित आरोपी हा सातारा बाजूकडून पुणे दिशेने कार क्रमांक KL09AG0334 मधून प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली.

दि. २३ जून २०२६ रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी व वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी आनेवाडी टोलनाका येथे वाहन अडवून तपासणी केली. यावेळी वाहनातील इसमाने आपले नाव शंमूगम श्रीनिवास (रा. गणपती नगर, चेन्नई, तमिळनाडू) असे सांगितले.

पडताळणीअंती सदर इसम हा जी-१ विपेरी पोलीस ठाणे, चेन्नई येथे दाखल असलेल्या गुन्हा रजि. क्र. १८२/२०२६ मधील NDPS कायद्यांतर्गत गुन्ह्याचा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध NDPS Act कलम 8(c), 22(b), 22(c), 25 आणि 29(1) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

त्यानुसार आरोपीस ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पुढील तपास व कारवाईसाठी आरोपीला चेन्नई येथील जी-१ विपेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविचंद्रन एम. व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल इंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत सपोनि पृथ्वीराज ताटे तसेच पोलीस अंमलदार सुशांत धुमाळ, सोमनाथ बल्लाळ, अजित पवार आणि रोहन चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!