Mon, Apr 6, 2026
प्रशासन

किकली गावचे सुपुत्र राकेश जाधव यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

किकली गावचे सुपुत्र राकेश जाधव यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती
Ashok Ithape
  • PublishedApril 6, 2026

कर्तव्यदक्ष सेवेला मिळाला मान — राज्य गुप्तवार्ता विभागात मुख्य गुप्तवार्ता अधिकारी म्हणून नियुक्ती.

भुईंज : प्रतिनिधी l किकली (ता. वाई) येथील सुपुत्र तथा राज्य गुप्तवार्ता विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गोरख जाधव यांची नुकतीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे किकली परिसरासह संपूर्ण वाई तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

राकेश जाधव यांनी पोलीस खात्यात विविध जबाबदाऱ्या अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि कार्यकुशल पद्धतीने पार पाडल्या आहेत. गृह विभागात उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी आपल्या सेवेमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत सन २०२३ मध्ये पोलीस महासंचालकांकडून त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.

सध्या त्यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, सीआयडी मुंबई येथे मुख्य गुप्तवार्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नती व नियुक्तीबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, वाई तालुक्याचे आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन तसेच सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी अभिनंदन केले आहे.

याशिवाय किकली-भुईंज परिसरातील मित्रपरिवार, नागरिक आणि नातेवाईकांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!