Thu, Jan 15, 2026
पोलीस डायरी

हॉटेलमध्ये आढळलेली बॅग मूळ मालकास प्रामाणिकपणे केली परत

हॉटेलमध्ये आढळलेली बॅग मूळ मालकास प्रामाणिकपणे केली परत
Ashok Ithape
  • PublishedMay 13, 2024

हॉटेल मालक सुधीर यादव यांचे सर्वत्र कौतुक

भुईंज l प्रतिनिधी

हॉटेल व्यावसायिकाने ग्राहकाला विसरलेली बॅग केली प्रामाणिकपणे परत लाखो रुपयांचा ऐवज पोलिसांच्या समोर बॅग मालकास दिल्याने सुधीर यादव यांचे सर्वत्र कौतुक,

याबाबत सविस्तर माहिती अशी की महामार्गावरील सुरुर येथील हॉटेल साई पार्क ईन येथे पुणे ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या खाजगी बस मधील प्रवासी शुभम साईबाबा गोडसेलवार रा,पुणे यांची बॅग हॉटेलमध्ये विसरली होती, व बस तशीच पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली दरम्यान ही बॅग हॉटेल मालक सुधीर यादव यांच्या नजरेस पडली व त्यांनी बॅग मालकाचा शोध सुरू केला,
काही वेळाने संबंधित बॅग मालकाने यादव यांचेशी सम्पर्क झाला व त्यांना भुईंज पोलीस स्टेशनमध्ये बोलवून रीतसर खातरजमा करून बॅग भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचे हस्ते देण्यात आली.

सुधीर यादव यांनी यापूर्वी ही अनेक ग्राहकांना विसरलेले ऐवज व किंमती वस्तू परत केल्या आहेत.
सुधीर यादव यांच्या या प्रामाणिकपणा ची दखल घेत लवकरच त्यांना जिल्हा पोलीस दलाचे वतीने सन्मान करण्यात येणार असल्याचे स,पो,नी गर्जे यांनी सांगितले यावेळी स्वराज यादव व हॉटेल साई पार्क चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!