Mon, Mar 2, 2026
आरोग्य स्थानिक बातम्या

महिलांच्या मोफत आरोग्य शिबिराचा केंजळ पंचक्रोशीतील महिलांनी लाभ घ्यावा

महिलांच्या मोफत आरोग्य शिबिराचा केंजळ पंचक्रोशीतील महिलांनी लाभ घ्यावा
Ashok Ithape
  • PublishedOctober 19, 2024

रविवार दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

वाई : ग्रामपंचायत केंजळ ही सामाजिक कार्यात अग्रगण्य असणारी ग्रामपंचायत म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यात ज्ञात आहे. या सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन सदर वैद्यकीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे ग्रामपंचायत केंजळ आणि पाटील हॉस्पिटल वाई यांच्या संयुक्त विद्यमाने केंजळ येथे उद्या रविवार दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार, मोफत रक्त- लघवी तपासणी, समुपदेशन तसेच स्त्रियांच्या विविध आजारावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन होणार आहे.

या शिबिरा संदर्भात अधिक माहिती देताना केंजळ ग्रामपंचायतिचे उपसरपंच(माजी सैनिक )निलेश जगताप असे म्हणाले की वाई येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. अजय पाटील यांच्या पाटील हॉस्पिटलच्या आठव्या वर्धापन दिना निमित्त पाटील हॉस्पिटल व ग्रामपंचायत केंजळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी केंजळ पंचक्रोशीतील सर्व गरीब तथा गरजू महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन देखील उपसरपंच जगताप यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!