Mon, Mar 2, 2026
शिक्षण

यशवंतराव चव्हाण महाविद्याल पाचवड येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

यशवंतराव चव्हाण महाविद्याल पाचवड येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
Ashok Ithape
  • PublishedOctober 17, 2024

भुईंज : आजच्या पिढीला वाचनाची गरज असुन शिक्षकांसोबतच पालकांनी देखील आपल्या पाल्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पाचवड महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा बोबडे यांनी केले.

पाचवड ता.वाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन व भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना आदरांजली आशा संयुक्त कार्यक्रमाप्रसंगी प्रा. मंजुषा बोबडे बोलत होत्या यावेळी बोलताना सध्याचे युग मोबाईलचे असून वाचनाची आवड ज्या पद्धतीने हवी तशी या पिढीत दिसून येत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांना वाचनाची खरी गरज असून त्यासाठी शिक्षकांसह पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे.

यावेळी महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीचे औचित्य व त्यांचे विचार, शिकवण विद्यार्थ्यांना समजावी व उदयोन्मुख ज्ञान संपन्न विद्यार्थी निर्माण व्हावा हाच विद्यालयाचा मुख्य उद्देश असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वरील कार्यक्रमाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी वाचन केले. यावेळी प्रा. शरद पवार, विनोद अवघडे, राणी शिंदे व विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. प्रणाली गेडाम व आभार डॉ. दिलीप घोलप यांनी मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!