Mon, Mar 2, 2026
अध्यात्म देश विदेश

बोरगाव येथील दुर्गादेवीच्या आरतीला इस्राईलचे पाहुणे

बोरगाव येथील दुर्गादेवीच्या आरतीला इस्राईलचे पाहुणे
Ashok Ithape
  • PublishedOctober 9, 2024

भुईंज : महेंद्रआबा जाधवराव

बोरगाव ता. सातारा येथील रामेश्वर चौकातील नवरात्र दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या आरतीचा मान मिळाल्याने इस्राईल येथून आलेले पाहुणे वल्लदिस्लाव आँफ्रांको, केरेन सेदार, नीर नुरियल व यासी अब्राहम मिलमान यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. देवीच्या आरतीत तल्लीन होतंच सर्वांनी दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन घेतले.

कृषिप्रधान भारतातील शेती पिकांचा अभ्यास करण्यासाठी इस्राईलचे एक पथक सातारा तालुक्यात आले आहे. याच पथकातील वल्लदिस्लाव आँफ्रांको, केरेन सेदार, नीर नुरियल व यासी अब्राहम मिलमान यांना जानकी ऍग्रोचे मालक शहाजी साळुंखे व शेखर साळुंखे यांनी देवीच्या आरतीला आमंत्रित केले होते.

बोरगावची मानाची पहिली आई भवानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या
रामेश्वर चौकातील नवरात्र दुर्गादेवी उत्सव मंडळाची स्थापना १९९६ साली झाली आहे. पर्यावरण पूरक उत्सवाची संकल्पना.. चला पर्यावरण पूरक उत्सव साजरे करुया.. अशा सामाजिक जाणीव ठेवीत दुर्गादेवी उत्सव काळात मंडळातर्फे वृक्षारोपण आरोग्य शिबिर,भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात.

मंडळाचे अध्यक्ष राहुल लोखंडे उपाध्यक्ष युवराज बनकर यांनी परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे खजिनदार दत्तात्रय सुतार, सागर साळुंखे, शेखर साळुंखे, प्रज्योत साळुंखे, राहुल साळुंखे, निलेश जगताप, शंकर काटवटे सुहास सुतार, धीरज साळुंखे,अभिजित घाडगे, व मंडळाचे सर्व सभासद, प्रमुख कार्यकर्ते आणि महिलांवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर्शन कला केंद्र बोरगाव येथील
पर्यावरण प्रेमी मूर्तिकार मारुती कुंभार यांच्या हातून देवीची सुंदर आणि सुबक मूर्ती साकारली आहे. सदरची मूर्ती माती माध्यम मध्ये असून पर्यावरण पूरक आहे मूर्तीची उंची ९ फूट ९ इंच असून, मूर्तीचे वजन फक्त ६० किलो आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!