बोरगाव शाळेच्या मुलींच्या कबड्डी संघाचा सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
वाई : बोरगाव शाळेच्या मुलींच्या कबड्डी संघाचा वाई तालुक्यात प्रथम क्रमांक क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य ,
सातारा जिल्हा परिषद सातारा व जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सातारा जिल्हा स्तरिय शालेय कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव शाळेच्या १७ वर्षे मुलींच्या गटाच्या संघाने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला या संघात सृष्टी गायकवाड, रिया कोंढाळकर, वैष्णवी जाधव , सृष्टी ओंबळे, सुहानी तरडे ,सानिका कळंबे , सई गाढवे , वैदही घाडगे, अक्षदा जाधव , दिक्षा चिकणे , प्रिया वाडकर , अमृता चव्हाण या मुलींचा सहभाग होता . विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कोळी साहेबांच्या हस्ते ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक अजित वाडकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. दिनकरराव कांबळे, उपाध्यक्ष श्री नारायणराव वाडकर , सचिव श्री आनंदा वाडकर तज्ञ संचालक श्री. बाळकृष्ण तरडे सर सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. संतोष वाडकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व पालक यांनी आभार मानले व शुभेच्छा दिल्या.













