Mon, Mar 2, 2026
क्रीडा

बहुचर्चित वाई मॅरेथॉनचे 08 डिसेंबरला आयोजन

बहुचर्चित वाई मॅरेथॉनचे 08 डिसेंबरला आयोजन
Ashok Ithape
  • PublishedOctober 3, 2024

रजिस्ट्रेशनला 03 ऑक्टोबर पासून सुरुवात

“निरतिशयम् धावन्ति” “Run beyond limits” ही टॅग लाईन घेऊन ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या वाई शहरात टिम वाई स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या मार्फत व गरवारे प्रायोजक यांच्यासह *वाई हाफ मॅरेथॉनच्या पाचव्या पर्वाचे* आयोजन करण्यात येत आहे.

दि. 08 डिसेंबर 2024 रोजी वाई हाफ मॅरेथॉनची सुरवात द्रविड हायस्कूल वाई येथून होईल. दरम्यान महागणपती वाई , मराठी विश्वकोष कार्यालय, नाना फडणवीस वाडा , कृष्णा घाट मेणवली, धोम धरण जलाशय, पांडवगड, कमळगड अशा ऐतिहासिक ठिकाणांचे व धार्मिक वास्तूंचे दर्शन घडवित हिरव्यागार निसर्गरम्य परीसरात सकाळचे कोवळे ऊन अंगावर स्पर्शित, हिवाळ्याच्या गुलाबी थंडीचा आनंद घेत मॅरेथॉन धावण्याचा आपला आनंद अविस्मरणीय असेल.

21 कि.मी., 10 कि.मी. व 3 कि . मी. अशा विविध गटात विभागलेल्या या मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून न बघता शारीरिक तंदुरूस्तीसाठी आजची सुरूवात समजा.
मग आता वाट कसली पाहताय सोबतच्या लिंक वर जावून आपली नोंदणी आजच करा. https://www.townscript.com/e/garware-wai-half-marathon-2024

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!