श्री टेक्निकल इन्स्टिट्यूट, वाई मध्ये मराठा समाजातील युवकांसाठी मोफत कॉम्प्युटर कोर्सचे उदघाटन
वाई l प्रतिनिधी:
मराठा समाजातील युवकांना विविध कौशल्य आणि रोजगारांच्या संधीमध्ये प्रगती करण्यासाठी सार्थी या संस्थेच्या कॉम्प्युटर कोर्सेचे उद्घाटन श्री अनिल गावंडे एमकेसीएलचे पश्चिम विभागीय प्रमुख व वाई पंचायत समितीचे बी.डी.ओ. श्री विजय परीट यांच्या उपस्थितीत पार पडले.
अनिल गावंडे यांनी फीत कापून उद्घाटन या उपक्रमाचे उद्घाटन केले. संस्थेचे प्रमुख सतीश जेबले यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना संस्थेची माहिती व संस्थेमध्ये सुरू असलेल्या कोर्सची माहिती दिली. श्री विजय परीट यांनी आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या मनोगतामध्ये त्यांनी AI तसेच विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे सांगितले. उद्घाटक श्री अनिल गावंडे यांनी सार्थी या संस्थेबद्दल तसेच या कोर्समध्ये शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मॉड्यूल बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. हा सहा महिन्याचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले. तसेच आत्ता सुरू असलेल्या न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी हा सार्थीचा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करावा असे आव्हान त्यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकवाड हिने केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हर्षदा जगताप यांनी केले. सौ.गौरी शिंदे, सौ.मेघा शेलार, चेतन वाईकर सुरेश पाटणे यांनी परिश्रम घेतले.













