Mon, Mar 2, 2026
क्रीडा

पाचगणीच्या विद्यानिकेतन विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश

पाचगणीच्या विद्यानिकेतन विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश
Ashok Ithape
  • PublishedSeptember 20, 2024

वसीम शेख, प्रथमेश जाधव यांचे कौतुक

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा तसेच सातारा जिल्हा ॲमेच्यूअर   वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत पाचगणीच्या श्री विद्यानिकेतन हायस्कूलच्या वसीम शेख या विद्यार्थ्याने कांस्यपदक पटकावून उज्वल यश संपादन केले आहे.

साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री विद्यानिकेतन हायस्कूलच्या वसीम शेख या विद्यार्थ्याने कांस्यपदक पटकावले. तर याच विद्यालयाच्या प्रथमेश जाधव या विद्यार्थ्याने बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले व त्याची जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.
दोन्ही गुणवंत विद्यार्थी खेळाडूंचे विविध मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!