Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले प्रस्तावित

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले प्रस्तावित
Ashok Ithape
  • PublishedSeptember 18, 2024

जागतिक वारसा रथ विशेष सहभाग, मराठा गडकिल्ले आता जागतिक वारसा नामांकित

पुणे : दरवर्षाप्रमाणे यंदाही पुण्यामध्ये गणेश विसर्जन सोहळा अत्यंत सुंदर भव्य देखाव्यामध्ये गणेश भक्तांसाठी संपन्न झाला. पुण्यातील गणेश विसर्जन देखावे हे महाराष्ट्रतच नव्हे तर देशाच्या कानाकोपन्यातून लोक पाहण्यास येतात आणि त्याचा आनंद घेतात.

-पुणे गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्याचे ओच्च्युत्त साधून मा. डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी पुणे आणि डॉ. विलास, वाहणे सहायक संचालक पुरातत्व संचालनालय पुणे यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह‌यात छ. शिवाजी महाराजांचे भारतातील 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा नामांकन प्रचार प्रसार मोहिम् जागतिक वारसा रथ पुणे शहरातील अलका टॉकिज, या चौकात सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालय व पुरा तत्व विभाग पुणे यांच्या संयुक्त विदयमाने हा रथ लोकोपर्यंत पुणे प्रचार प्रसार करून आपल्या गडकिल्ल्यांची माहिती रथ चित्रफितीत करून, तसेच काही डिजिटल व्हिडिओ मोठ्या स्क्रिन वर दाखविण्यात आली. गडकिल्ल्यांची माहिती किल्ल्यांचे नकाशे, फोटो बॅनर द्वारे लोकांपर्यंत दाखविण्याचा प्रयत्न केला.आपले आराध्य दैवत म्हणून छ.शिवाजी महाराजांची आकर्षित मूर्ती ‘ जागतिक वारसा रथ ‘ मध्ये ठेवून तिचे पूजन करण्यात आले रथ आकर्षित फुले, बॅनर, डिजिटल स्क्रिन लावून सजविण्यात आली होती.

जागतिक वारसा नामांकनाच्याया प्रचार प्रसार मोहिमेमध्ये डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर व संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), पुणे MA Archeologi चे विदयार्थी , तसेच त्यांचे प्राध्यापक वर्ग निलेश जाधव सर हे देखील या मोहिमेत सहभागी होते . विद्यार्थीनी या मोहिमेत छ.शिवाजी महाराजांच्या आणि गडकिल्ल्यांच्या अनेक घोषणा दिल्या. रथाजवळ जनसमुदायाला सोबत विद्यार्थ्यांनी आपल्या गडकिल्ल्या बद्दल माहिती दिली.’ मराठा मिलिटरी लॅण्डस्केप ‘ अंतर्गत जागतिक वारसा मध्ये नामांकित होत असलेल्या 12 गडकिल्ल्यांच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचवली.
जागतिक वारसा रथ सोहळा प्रसंगी अनेक जनसमुदाय यां मोहिमेत सहभागी झाले आणि त्यांनी गडकिल्ले बद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेक लहान मुलांनी देखील शिवगर्जना नारा देऊन यां मोहिमेचे साक्षीदार झाले. तसेच पुरातत्व विभागाने याच रथ मोहिमेत स्वाक्षरी अभियान राबविले होते. त्यात हजारो शिवभक्तांनी सहभागी हाऊन आपल्या स्वाक्षरी करून जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार झाले.

‘जागतिक वारसा रथ ‘ सजावट करण्याकरिता विशेष सहकार्य म्हणून. उदयनराज शिंदे डायरेक्टर ऑफ मे. शिवाई कृष्णा रोपवेज प्रा. लि पुणे यांचा मोठा मोलाचा वाटा आहे.
तसेच ‘ जागतिक वारसा रथ ‘ प्रचार प्रसार मोहिमेकरीता सह्याद्री प्रतिष्ठान दुर्गसवर्धन या संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांची सहकार्य वर्ग देखील प्रचार प्रसार करण्याकरिता सहभागी झाले होते.

आपली संस्कृती आपला वारसा जपण्याची तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व अवघ्या महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगासमोर आन येण्यासाठी आपले 12 गडकिल्ले आता ( world heritage) UNESCO जागतिक वारसा स्थळ यादीत नामांकित होत आहे. हा वारसा जतन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी कर्तव्य आहे. गणेश विसर्जन मिरणुक सोहळा पुणे. या सोहळ्यात ‘ जागतिक वारसा रथ ‘ प्रचार प्रसार मोहीम राबविण्यात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, पुरातत्त्व विभाग पुणे, मे.शिवाई कृष्णा प्रा. लि पुणे. डेक्कन कॉलेज डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर व संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), पुणे जिल्हानियोजन समिती पुणे – किरण इंदलकर, दिनेश काळे, दानी तसेच आम्ही पुणेकर संस्था पुणे अध्यक्ष हेमंत जाधव,सह्याद्री प्रतिष्ठान संस्था व त्यांचे सहकारी वर्ग, शिवदुर्गसवर्धन पंडित अतिवाडकर यां सर्वांचे विशेष मोलाचे योगदान लाभल्याने लोकांपर्यंत चला होऊ जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार या माहिती प्रसार प्रचार करण्यास महत्वपूर्ण सोहळा आणि रथ यात्रा संपन्न झाली.

या रथसोहळ्या ठिकाणी जागतिक वारसा नामांकनाबद्दल मोहिमेची माहिती, शिवगर्जना, गणेश गर्जना, गणेश भक्तांचे स्वागत, आपल्या गडकिल्ले आणि जागतिक वारसा महत्व ‘ सौ सोनिया इथापे यांनी सूत्रसंचालन करून प्रचार प्रसार करण्याचे कार्य केले, त्याबद्दल त्याचे देखील आभार.

“आपले गडकिल्ले आपली शान, तव एवंम सम्मान
चला गडकिल्ले जतन सवर्धन करू जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार होऊ”

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!