Tue, Mar 3, 2026
अध्यात्म महाराष्ट्र

सद्गुरु नारायण महाराज यांच्यावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

सद्गुरु नारायण महाराज यांच्यावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
Ashok Ithape
  • PublishedSeptember 10, 2024

वरुणराजाच्या हजेरीत डोळ्यात अश्रु व दुःखद अंतकरणाने नारायणपूर येथे सद्गुरु नारायण महाराज यांच्यावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

भुईंज :  श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) ९ सप्टेंबर रोजी रात्री नारायण महाराज यांना देवाज्ञा झाली असून आज १० सप्टेंबर रोजी सकाळी सद्गुरु नारायण महाराज यांचे पार्थिव देह हा भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. याठिकाणी दोन वाजेपर्यंत लोकांनी दर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या रथात पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर भजनी मंडळाच्या मागे दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास रथाची ग्रामप्रदर्शना झाली. यावेळी ग्रामस्थांनी जड अंतकरणाने रथावर पुष्पवृष्टी केली.

२०० कोटी यज्ञकुंडाच्या कडेला दुपारी ४ वाजण्याच्या सुमाराला अंत्यविधी करण्यात आला. पोपट महाराज स्वामी यांनी अग्नी दिला. यावेळी “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” चा जयघोष करण्यात आला.

अंत्यविधी प्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार मदनदादा भोसले खासदार अशोक मोहोळ, आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार महेश लांडगे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे’ संभाजी झेंडे, उल्हास पवार, पी डी पाटील, माजी आमदार संभाजी कुंजीर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, भरतनाना क्षिरसागर, अशोक मोहोळ, अंकुश दरेकर, यशवंत कुलकर्णी, भीमराव तापकीर, शशिकांत मुजुमदार, दीपक पायगुडे, वसंत मोरे, बाळासाहेब भिंताडे, मुरार जाधव, रामदास मेमाणे, तात्यासाहेब भिंताडे, भरतनाना क्षिरसागर, दिगंबर भिंताडे, रामभाऊ बोरकर, चंद्रकांत बोरकर, प्रदीप बोरकर, मारुती बोरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!