ऋषीपंचमी दिनी सायंकाळी भृगूऋषींच्या समाधी मंदिराला इंद्रधनूने घातला अभिषेक
![]()
भुईंज येथेआचार्य भृगुऋषी मठ व भृगूकन्या महालक्ष्मी मंदिर परिसरात महिला भाविकांची गर्दी अलोट गर्दी.

भुईंज : ऋषीपंचमी निमित्त भुईंजच्या कृष्णा नदीच्या काठावर आचार्य भृगूऋषी मठात महिला भाविकांची गर्दी. श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्वचैतन्य प.पू.श्री. सद्गुरू नारायण महाराज (आण्णा) यांच्या कृपाशिर्वादाने ऋषीपंचमीचा उपवासाच्या महाप्रसादाने ऋषीपंचमीचा महिमा जोपासण्यासाठी राज्यभरातून आलेल्या महिलांच्या गर्दीने अवघा कृष्णा काठ धन्य झाला प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थी नंतर दुस-याच दिवशी येणारी ऋषीपंचमी हा महिलांच्या व्रतवैकल्याचा सोहळा साजरा करण्यात येतो.
याहीवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच कृष्णा नदीच्या काठावर महिला भाविकांनी स्नानपर्वणीसाठी गर्दी केली होती. देवी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन भृगूऋषीमठ, समाधीस्थळत अभिषेक, आरती झाल्यानंतर उपवासाच्या भात भाजीचा महाप्रसाद घेऊन महिलांनी हा ऋषीपंचमीचा उत्सव साजरा केला.
श्री क्षेत्र नारायणपूर येथील शिष्यपरिवार यांनी पौरोहित्य केले भृगूऋषीमठ सेवेकरी, दत्त सेवेकरी, सदगुरू आण्णांच्या लेकी व महिला सेवेकरी, आचार्य भृगूमठ सेवेकरी तिर्थक्षेत्र भुईज युवा सेवेकरी यांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते.
कृष्णा नदीपात्रात नुकताच आलेला पूर व नदीपात्रात वाढलेले पाणी विचारात घेऊन भुईंज येथे ग्रामस्थांच्या वतीने महिलांच्या स्नान पर्वणीसाठी महिलांचे दक्षता पथक तैनात ठेवले होते तर भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे व महिला सहकारी टीमने विशेष सुरक्षा पुरवली.













