भुईंज : तिरंगा स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवूण कला आणि निसर्गाची पूजा करत राष्ट्रीय कार्याला हातभार लावला नेहमीच मोबाईलशी जवळीक करणा-या वालचमूच्या हातांना माती लागताना पाहणा-या पालकांनीहि केले आपल्या मुलांचे कौतुक.
पाचवड ता. वाई येथील तिरंगा इंग्लिश मेडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करताना याची सुरूवात इको पेंडली गणेशमुर्ती बनवणे म्हणजेच मातीचे गणपती मूर्ती निंर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. यात सर्वच विद्यार्थी विद्यार्थीनी सहभाग घेवून निसर्गाचे संवर्धन करू वा असा संदेश देत याच बनविलेल्या गणेशमुर्ती घरोघरी जावून बसविण्याचा संकल्प केला.
या कार्यशाळेसाठी उडतारे येथील गणेशमुर्ती बनविणारे संभाजीराव कुंभार आणि संतोष कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक अक्षय चव्हाण यांनी कार्यशाळा यशस्वी केली.
तिरंगा स्कुलचे मार्गदर्शक जयवंत पवार व मार्गदर्शिका वनिता पवार मुख्याध्यापिका वैशाली कुंभार वांनी सर्व विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गणेशमुर्तीची पाहणी करून कौतुक केले.
यावेळी बनविलेल्या गणेशमुर्तीची पाहणी करताना पालकांनी समाधान व्यक्त करत मोबाईलची सतत जवळीक करणारे हात आज मातीशी जवळीक करतात याचा आनंद आहे. तिरंगा स्कुलचे सर्वच उपक्रम व कार्यक्रम समाजहित व राष्ट्रहित जपणारे आहेत अशा प्रतिक्रीया त्यांनी दिल्या.













