Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र सातारा जिल्हा

‘किसन वीर’वर होणार खासदार नितीनकाका पाटील यांचा सत्कार समारंभ – प्रमोद शिंदे

‘किसन वीर’वर होणार खासदार नितीनकाका पाटील यांचा सत्कार समारंभ – प्रमोद शिंदे
Ashok Ithape
  • PublishedAugust 28, 2024

वाई दि. 28 : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीनकाका पाटील यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. मंगळवार दि. २७ रोजी त्यांचे जिल्ह्यात आगमन झालेले असून कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वरूपात स्वागत केलेले होते. कारखाना कार्यस्थळावर गुरूवार (दि. २९) रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांचे आगमन होणार असून कारखान्याच्यावतीने त्यांचे यथोचित स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील
यांना मिळालेले कॅबिनेट मंत्रीपद नाकारून शेतकऱ्यांनी दिलेली जबाबदारी महत्वाची असल्याने किसन वीर व खंडाळा कारखान्याला मदत करून शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना वाचण्यासाठी मदत करा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना केलेले होते. आमदार मकरंदआबांना कारखाना वाचविण्यासाठी दिलेला शब्द खरा करीत नामदार अजितदादांनी किसन वीर कारखान्यास ३२७ तर खंडाळा कारखान्यास १४० कोटीची थकहमी मिळवुन देऊन दोन्ही कारखाने वाचविलेले आहेत. तसेच लोकसभेला साताराची जागा महायुतीतील मित्रपक्षाला सोडल्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेले होते. त्यावेळी वाईच्या सभेत शब्द दिलेला होता कि लोकसभेला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडुन आणा मी नितीनकाकांना खासदार करतो. त्याप्रमाणे अजितदादा पवार यांनी आपला शब्द खरा केला व नितीनकाकांना राज्यसभेवर खासदार म्हणुन बिनविरोध निवडुन आणले. नितीनकाका खासदार झाल्यानंतर प्रथमच आज कारखाना कार्यस्थळावर येत असल्याने संचालक मंडळ, सातारा सहकारी ऊस तोडणी सोसायटी, कामगार युनियन, आबासाहेब वीर कामगार पतसंस्था, किसन वीर कामगार पतसंस्था, कामगार कल्याण मंडळाने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमुद केलेले आहे.

खासदार नितीनकाका पाटील यांचा आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील व पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!