Mon, Mar 2, 2026
सामाजिक

रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहात महिला बंदयांनी तयार केल्या राख्या

रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहात महिला बंदयांनी तयार केल्या राख्या
Ashok Ithape
  • PublishedAugust 11, 2024
महिलांनी राख्या खरेदी करण्याचे कारागृह प्रशासनाचे आवाहन
सातारा दि.11- कारागृहातील महिला बंद्यांच्या हाताला काम मिळावे या उदात्त धोरणाने आणि विचारणे पुणे विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक, स्वाती साठे यांनी संकल्पनेतून आणि माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या सहकार्याने सातारा कारागृहातील महिला बंद्यांना सुबक व आकर्षक राखी तयार केल्या आहेत. आहे. ह्या राख्या महिलांनी खरेदी करावे, असे आवाहन  कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी केले.
यामध्ये माणदेशी फाउंडेशन, शाखा सातारा येथील प्रोग्रॅम डायरेक्टर अपर्णा सावंत यांच्या योजने अंतर्गत महिला बंद्यांना रक्षाबंधनचे औचित्य साधून राखी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण ट्रेनर जया काळे, धनश्री पवार यांनी दिले. सदर प्रशिक्षणामध्ये कारागृहातील सर्व महिला बंद्यांनी 200 हून अधिक आकर्षक व सुबक राख्या तयार केल्या.
सदर राखी तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमा वेळेस अपर्णा सावंत, ट्रेनर जया काळे, धनश्री पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, महिला शिपाई गीता दाभाडे, जयश्री पवार, मीनाक्षी जाधव, माधुरी वायकर, ज्योती शिंगरे, रूपाली नलावडे, अंकिता करपे, प्रतीक्षा मोरे इत्यादी हजर होते.
प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी यांनी केले होते.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!