Thu, Jun 4, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत निधी वाटपाच्या कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत निधी वाटपाच्या कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई
Ashok Ithape
  • PublishedAugust 9, 2024

सातारा दि. 9 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजार 17 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 5 लाख 10 हजार 419 इतक्या अर्जांना मान्यता दिली आहे. याची टक्केवारी 98.42 असून या योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथे होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या अर्जांना मंजुरी दिलेली नाही त्या अर्जाना तात्काळ मंजुरी द्यावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई सांगून मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिला लाभार्थी येतील यासाठी नियोजन करावे. महिलांसाठी वाहनांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावेळी 5 युवकांना नियुक्तीचे पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच वीर पत्नी साधना साळुंके, अतित ता. खंडाळा यांना शासनाकडून 2 हेक्टर जमिन वाटपाचे आदेशाचे प्रदान करण्यात आले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!