जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र कराड यांच्यावतीने गुरुपौर्णिमा महोत्सव 2024 कृतज्ञता दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव बुद्रुक मॉडेल स्कूल येथे कार्यरत असलेल्या विलासराव श्रीपती आपटे यांना आदर्श शिक्षक सन्मानाने गौरविण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी(योजना)अनिस नायकवडी, ज्येष्ठ व्याख्यात्या शोभना अष्टपुत्रे,पर्यावरण अभ्यासक सुनील काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शोभना अष्टपुत्रे म्हणाल्या,शिक्षक हा चालता फिरता देव असतो.चांगले काम करणाऱ्यांच्या मध्ये देव पहावा. प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि अनुभूती आपल्याला हवी. आपल्या जीवनात आई-वडिलांच्या बरोबर शिक्षकाचेही महत्व खूप आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षकांचा झालेला सन्मान हा माझ्या दृष्टीने खूप मोलाचा कार्यक्रम आहे.
जीवनविद्या मिशन मुंबई कराड शाखेचे अध्यक्ष प्रविण थोरात,जीवनविद्या फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप महाजन व कराड शाखेतील सर्व मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी गुरुपूजन करण्यात आले.आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
फोटो-कराड- येथे विलासराव आपटे यांना सन्मानित करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी(योजना)अनिस नायकवडी,पर्यावरण अभ्यासक सुनील काळे,दिलीप महाजन













