Mon, Mar 2, 2026
आरोग्य

डॉ.शंतनु अभ्यंकर यांना सेवाव्रती डॉक्टर पुरस्कार प्रदान

डॉ.शंतनु अभ्यंकर यांना सेवाव्रती डॉक्टर पुरस्कार प्रदान
Ashok Ithape
  • PublishedJune 9, 2024

‘वाई दि ८ :-स्त्रियांचे डॉक्टर स्त्रि-प्रश्नावर अभावाने व्यक्त होतात, याचे कारण उभयपक्षी शोधायला हवे’, असे प्रतिपादन डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी केले. हुंडा विरोधी चळवळ, मुंबई या संस्थेतर्फे, कै. शकुंतला परळकर स्मृत्यर्थ देण्यात येणारा सेवाव्रती डॉक्टर पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते.

चळवळीचे विश्वस्त ॲड.जयप्रकाश सावंत, डॉ सौ रश्मी फडणवीस यांच्या हस्ते डॉ शंतनु अंभ्यकर यांना सुताचा हार घालून मानपत्र देऊन पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ रुपाली अभ्यंकर समवेत होत्या.

डॉक्टरांना स्त्रियांचे प्रश्न अधिक थेटपणे जाणवत असतात मात्र स्त्री चळवळीत त्यांचा सहभाग नसतो. वैद्यकीय पुस्तकांची स्त्रीवादी चिकित्सेने आपले डोळे उघडल्याचे सांगून, डीएमपीए या गर्भनिरोधक इंजेक्शनला, एचपीव्ही लसीकरणाला तसेच गर्भनिरोधकांच्या संशोधनाबद्दल स्त्री चळवळीने आवाजवी भूमिका घेतल्याची टीकाही त्यांनी केली. त्याचवेळी स्टीफन पिंकर यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन चळवळीला लक्षणीय यश मिळाल्याचे त्यांनी दाखवून दिले. हे यश आपण साजरे करायला हवा असेही ते म्हणाले.

ॲड. जयप्रकाश सावंत यांनी प्रस्तावना केली.संस्थेच्या सेक्रेटरी आशा कुलकर्णी यांनी संस्थेची ओळख करुन दिली. डॉ रश्मी फडणवीस यांनी मानपत्राचे वाचन केले.

सन्मानचिन्ह, मानपत्र व दहा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी संस्थेची आणि श्री.आशुतोष उकिडवे यांची पुस्तके लो टिळक स्मारक संस्थेस देण्यात आली.
श्री दत्ता मर्ढेकर यांनी समारोप केला. श्री. उकीडवे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला जयश्री बोंद्रे, ज्येष्ठ विचारवंत श्री दत्ता देसाई, सौ मीरा शरद अंभ्यकर टिळक स्मारक संस्थेचे अनिल जोशी, भद्रेश भाटे, भालचंद्र मोने,सौ माया अंभ्यकर ,सौ अनुराधा कोल्हापुरे,सौ तनुजा इनामदार, श्रीनिवास खरे, आदित्य चौंडे,सौ स्मिता कान्हेरे,सौ मेधा साळवेकर संचालक, पदाधिकारी तसेच वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!