Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

बेजबाबदार महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलन उभारणार.. भुईंज प्रेस क्लबचे जेष्ठ मार्गदर्शक महेंद्रआबा जाधव यांचा जिल्हा प्रशासनास इशारा..

बेजबाबदार महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलन उभारणार.. भुईंज प्रेस क्लबचे जेष्ठ मार्गदर्शक महेंद्रआबा जाधव यांचा जिल्हा प्रशासनास इशारा..
Ashok Ithape
  • PublishedJune 9, 2024

भुईंज येथील बदेवाडी पुलावर पुराचे पाणी ; पावसाळ्याच्या दिवसात दुर्घटना होण्याची दाट शक्यता

भुईंज दि. 09 : येथील बदेवाडी पुलावर व सेवा रस्त्याच्या बोगदा भागात मुसळधार पावसामुळे नदीचे स्वरूप आले आहे. पावसाच्या पाण्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या चुकीच्या नियोजनमुळे वाहधारक व सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रार करूनही महामार्गचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आले आहेत.

पुढील ४८ तास मुसळधार पावसाची श्यक्यता वर्तवण्यात आल्याने यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. काल रात्री एक मोठी दुर्घटना घडता घडता टळली आहे.

भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने भुईंज बादेवाडी येथे उपाययोजना करण्यात याव्यात. अशीच धोकादायक परिस्थिती संपूर्ण महामार्गच्या सेवा रस्त्यावर झालेली आहे. याबाबत तात्काळ योग्य त्या उपाययोजना न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरोधात जिल्हाभर आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा महेंद्र (आबा ) जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!