निधन वार्ता….
वाई दि ८ :– ज्ञानदीप को-आॅप क्रेडिट सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यावर्धिनी संस्थेचे विश्वस्त दिलीप चव्हाण यांचे वडील नथुराम सदाशिव चव्हाण वय ९४ यांचे शनिवारी सायंकाळी ६-१५ वा.वाई येथील हाॅस्पिटल मध्ये उपचार चालू असताना निधन झाले.
त्यांनी मुंबईयेथे मिलमध्ये सुमारे तीस वर्षे नोकरी केल्यानंतर कवठे गावी आजतागायत शेती करीत होते. कवठे व परिसरातील लोकांना ते नेहमी सर्व प्रकारचे सहकार्य करीत असत. त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा,दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचेवर विठ्ठलवाडी कवठे ता वाई येथे रविवार दि ९ जुन रोजी सकाळी ९ वा अंत्यविधी होणार आहे.













