संपतराव वाघ यांच्या शस्त्रक्रियेसाठी अर्थिक मदतीचे आवाहन
भुईंज दि. ३ : आसले, ता. वाई येथील सामाजिक कार्यकर्ते संपतराव बापुराव वाघ (वय ७ ८ वर्षे) यांच्या हृदयातील वाॅल्व खराब झाल्याने नविन बसविण्याचा सल्ला त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेला आहे. याकरिता वाघ कुटुंबीयांनी समाजातील दानशूर व्यक्तींना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
संपतराव वाघ यांची अर्थिक परिस्थिती बेताची आहे. यापुर्वी सुमारे १८ वर्षांपुर्वी त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु मागील वर्षांपासून त्यांना त्रास होत असल्याने डाॅक्टरांनी पुन्हा वाॅल्व बदलण्याचा सल्ला दिला आहे. सदरची शस्त्रक्रिया पुणे येथील ज्युपिटर हाॅस्पिटलमधील तज्ञांच्या देखरेखीखाली कराड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये होणार आहे. यासाठी सुमारे १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
संपतराव वाघ यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मदतीची गरज आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी संपतराव वाघ यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, असे आवाहनही वाघ कुटुंबीयांनी केलेली आहे. दानशूर व्यक्तींनी खाली दिलेल्या माहितीवर आपली मदतीची रक्कम पाठवावी.
A/c. No. 50100290543335
IFSC CODE HDFC0002692
GOOGLE PAY No. 9975421777
Shree. AJAY MANE





















