Thu, Jun 4, 2026
अभिष्टचिंतन

कामगारांच्या सर्वांगीण हितासाठी झटणारे कामगार अध्यक्ष कृष्णात धनवे.

कामगारांच्या सर्वांगीण हितासाठी झटणारे कामगार अध्यक्ष कृष्णात धनवे.
Ashok Ithape
  • PublishedJune 6, 2024

महाराष्ट्र राज्य कामगार युनियनचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी वाढदिवसानिमित्त केले कौतुक.

भुईंज : महेंद्रआबा जाधवराव

आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (महाराजसाहेब) यांचे कल्पक व कुशल नेतृत्वाखाली तसेच कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते साहेब यांच्या उत्तम प्रशासनाखाली नावाजलेल्या अजिंक्यतारा सह. साखर कारखान्याचे कामगार युनियन अध्यक्ष कृष्णात धनवे यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य कामगार युनियनचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सदस्य शंकरराव भोसले, सरचिटणीस सयाजीराव कदम आणि अजिंक्यतारा कामगार युनियनचे उपाध्यक्ष संतोष पोतेकर, खजिनदार संतोष शिंगटे व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत साखर कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात आला.

कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील संवादाचे माध्यम म्हणून काम पाहणारे कामगार अध्यक्ष म्हणून कृष्णात धनवे व त्यांचे सर्व सहकारी यांचा कामगारांच्या सामान्य हितासाठी कार्य करणारी कामगार युनियन म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे.
कामगारांना योग्य वेतन, चांगले कामाचे वातावरण, कामाचे ठरावीक तास आणि फायदे यासारख्या मुद्द्यांमध्ये युनियन सदैव काम करीत आली आहे. व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात दुवा बनून काम युनियनला राज्य युनियन व आमचे नेहमीच सहकार्य राहील असेहि तात्यासाहेब काळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

वाढदिवस कार्यक्रमास हेड टाइमकिपर राजाराम कणसे, विकास कदम, दिलीप शेडगे, रामचंद्र किर्दत, संजय काटे, शत्रुघ्न मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
(फोटो : किशोर निकम )

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!