Thu, Jun 4, 2026
Close

Recent Posts

आरोग्य सामाजिक

महिला डॉक्टर सांभाळणार वाई ‘आयएमए’ची कमान !

महिला डॉक्टर सांभाळणार वाई ‘आयएमए’ची कमान !
Ashok Ithape
  • PublishedMay 30, 2024

नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ आज.

वाई l प्रतिनिधी:

इंडियन मेडिकल असोसिएशन वाई ही डॉक्टरांची संघटना सामाजिक कामात अग्रेसर असते. यावर्षी या संस्थेत एक नवा इतिहास रचला जातोय. जुन्या कार्यकारिणीचा काळ संपूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी वाई आय. एम. ए. ही संस्था वाईतील काही ज्येष्ठ महिला डॉक्टर सांभाळणार आहेत.

संपूर्ण देशातल्या आय एम ए च्या शाखांसाठी एक नवा वस्तूपाठच घालून दिला जातोय. आज वाई मध्ये या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ संपन्न होणार आहे. डॉ. मंगला अहिवळे यांची पुढील दोन वर्षांसाठी वाई आय एम ए च्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आलेली आहे.

इतर पदाधिकारी उपाध्यक्षा डॉ. मेधा घोटवडेकर,सचिव डॉ. लता पाटील, कोषाध्यक्ष डॉ. स्वाती देशपांडे तर सदस्य म्हणून डॉ. उल्का पोळ आणि डॉ. उल्का कदम यांची निवड करण्यात आलेली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!