Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

आंबा महोत्सवास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची भेट

आंबा महोत्सवास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची भेट
Ashok Ithape
  • PublishedMay 25, 2024

सांगली दि. २१ (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य कृषि विभाग सांगली व कृषि पणन मंडळामार्फत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत ‘सांगली आंबा महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज या आंबा महोत्सवास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी कृषि पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, कृषी उपसंचालक श्री. पाटील व आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

24 ते 26 मे 2024 या कालावधीत कच्छी जैन भवन, राम मंदिर चौक, सांगली येथे हा आंबा महोत्सव होत आहे. या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, स्थानिक केशर आंबा व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. या महोत्सवाचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!