Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतला रेड क्रॉस सोसायटीच्या कार्याचा आढावा

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतला रेड क्रॉस सोसायटीच्या कार्याचा आढावा
Ashok Ithape
  • PublishedMay 22, 2024

पाचगणी येथील बेल एअर रुग्णालयास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रेड क्रॉस सोसायटीने मानले राज्यपालांचे आभार

सातारा, दि. २२ – रेड क्रॉस सोसायटीच्या पाचगणी येथील रुग्णालयासाठी २८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांचे आभार मानले. महाबळेश्र्वर येथील राजभवन येथे आज रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींसोबत राज्यपाल श्री. बैस यांनी बैठक घेतली त्यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले.

या बैठकीस राज्यपाल महोदयांच्या सहसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, रेड क्रॉस सोसायटीच्या बेल एअर रुग्णालयाचे संचालक फादर टोनी यांच्यासह सोसायटीचे सदस्य व डॉक्टर्स उपस्थित होते.

यावेळी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा देताना फादर टोनी यांनी संस्थेच्या सातारा जिल्ह्यातील स्थापनेची व सुरू असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. तसेच पाचगणी, वाई येथील संस्थेची रुग्णालये, शासनाची संस्थे मार्फत चालवण्यात येत असलेली रुग्णालये, या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी यांची सविस्तर माहिती दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!