Fri, Apr 17, 2026
महाराष्ट्र

राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले प्रशासनाच्यावतीने स्वागत

राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले प्रशासनाच्यावतीने स्वागत
Ashok Ithape
  • PublishedMay 21, 2024

सातारा, दि. 21 :- राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देवून प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.

राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असून त्यांचे आज सायंकाळी ६ वा. आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रामबाई बैस यांचेही आगमन झाले. याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल श्री. बैस यांचे स्वागत केले. राज्यपाल महोदय हे शनिवार दि. 25 मे 2024 पर्यंत महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!