‘पाॅवर फिटनेस’ ची हमी..’तंदुरुस्ती’ बरोबरच ‘वजन’ ही होईल कमी..!
![]()
४ महिन्यात तब्बल १५ किलो वजन घटविणा-या अमोल भोसले यांचा पाॅवर फिटनेस जीमने केला उचित सन्मान.
भुईंज। महेंद्रआबा जाधवराव
बदलत्या जीवनशैलीनुसार सध्या अनेक आजारांचा धोका वाढत चालला आहे. वाढते वजन आणि लठ्ठपणा याच कारणास्तव प्रत्येकजण आपल्या फिटनेसकडे लक्ष देतोय. निरोगी आणि तंदुरुस्त समाजनिर्मिती बरोबरच ग्रामीण भागातील युवकांमध्ये शास्त्रशुद्ध व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशातून सातारा तालुक्यातील वळसे गावचे सुपुत्र उमेश कदम (सर) यांनी बोरगाव ता.जि.सातारा येथे “पाॅवर फिटनेस ” नावाने जीम सुरु केली आहे.
खराब जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यांमुळे शरीरावर अनावश्यक चरबी वाढत जाते. एकदा चरबी जमा व्हायला लागली की ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. सतत जंक फूडचे सेवन, कामाचे आणि विविध गोष्टींचे असणारे ताण यांमुळे लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्य़े लठ्ठपणा ही एक महत्त्वाची समस्या झाली आहे. त्यामुळे उद्भवणारे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड यांसारख्या समस्यांचा सामना अनेकांना करावा लागत आहे. पण आपण वेळीच वजनावर नियंत्रण मिळवले तर आरोग्याच्या समस्या गंभीर होण्यापासून आपण स्वत:ला वाचवू शकू असा आत्मविश्वास उमेश कदम सरांना आल्यानेच ग्रामीण भागातील बोरगाव सारख्या गावात त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशी जीम सुरू केली आहे. सध्या पहाटे ५ ते स.१० आणि सायं. ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत अशा दोन सत्रात सुरू असलेल्या जीममध्ये ६५ युवक तंत्रशुद्ध व्यायाम करीत आहेत. तंदुरुस्त आणि निरोगी युवानिर्मीतीच्या या कार्यात त्यांना सुरज कदम व अशिष पवार या जीम ट्रेनर यांची विशेष मदत असते.
जीमच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्यदिव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपसितच रक्तदाते तसेच जीममध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या सभासदांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी केवळ चार महिन्यांतच ९१ किलोवरुन ७६ किलो वजन म्हणजेच तब्बल १५ किलो वजन कमी करणाऱ्या बोरगाव येथील अमोल भोसले यांचा उमेश कदम (सर) व मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी देवून विशेष सन्मान करण्यात आला.













