Sat, Apr 18, 2026
स्थानिक बातम्या

भुईंजचा जेष्ठ नागरिक संघ हा आदर्श संघ असून त्याचे अनुकरण राज्यभर करण्यासारखे आहे – स.पो.नि. रमेश गर्जे

भुईंजचा जेष्ठ नागरिक संघ हा आदर्श संघ असून त्याचे अनुकरण राज्यभर करण्यासारखे आहे – स.पो.नि. रमेश गर्जे
Ashok Ithape
  • PublishedApril 8, 2024

भुईज l प्रतिनिधी:

भुईंजचा जेष्ठ नागरिक संघ हा आदर्श संघ असून त्याचे अनुकरण राज्यभर करण्यासारखे आहे. म्हणूनच भुईंज पोलीस स्टेशन व प्रेस क्लब यांच्या प्रयत्नातून जेष्ठांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत लोकाभिमुक कार्यक्रम राभवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांनी केले.

भुईंज येथे जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेमध्ये जेष्ठांना कायदयाचे ज्ञान देत असताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रामदास जाधव, उपाध्यक्ष जगन्नाथ दगडे, स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती आप्पा बाबर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे पुढे म्हणाले की आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धत्व येणे हे जरी क्रमप्राप्त असले तरी जेष्ठांनी आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग गाव समाज व राष्ट्राच्या विकासासाठी कसा होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. भुईजचा संघ नेहमीच तालुक्यात आदर्श आहेच तो यापुढे राज्यभर कसा आदर्श होईल आणि त्याचे अनुकरण इतरांनी करावे यासाठी भुईंज पोलीस व भुईंज प्रेस क्लव सांघिक प्रयत्न करणार आहेत असे हि ते म्हणाले.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत ओमप्रकाश उर्फ रमेशआबा भोसले, सदाआण्णा भोसले, अशोक चव्हाण आदींनी केले. आभार जनार्दन खरे यांनी मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!