Mon, Mar 2, 2026
देश विदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
Ashok Ithape
  • PublishedApril 1, 2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (30 मार्च 2024) राष्ट्रपती भवन येथे आयोजित समारंभात भारतरत्न पुरस्कार प्रदान केले. पुढील मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न बहाल करण्यात आले:

पी.व्ही. नरसिंह राव मरणोत्तर. दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या वतीने त्यांचे पुत्र पी. व्ही.  प्रभाकर राव यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग मरणोत्तर.  स्वर्गीय चौधरी चरणसिंग यांच्या वतीने भारतरत्न हा पुरस्कार त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी स्वीकारला.

डॉ. एम.एस. स्वामिनाथन मरणोत्तर.  दिवंगत डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांच्या वतीने  त्यांच्या कन्या डॉ. नित्या राव यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

कर्पूरी ठाकूर मरणोत्तर.  दिवंगत  कर्पूरी ठाकूर यांच्या वतीने, त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!