डॉ.सुरेश अष्टपुत्रे यांनी रेखाटलेल्या ऐतिहासिक प्रसंगाची, फोटोफ्रेम खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेट
वाई, दि.२१:
जिजाऊ माँसाहेब बालशिवरायांना जेवू घालत आहेत,या डॉ.सुरेश अष्टपुत्रे यांनी स्वतः रेखाटलेल्या ऐतिहासिक प्रसंगाची,
फोटोफ्रेम खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेट दिली.
डॉ सुरेश अष्टपुत्रे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. खासदार उदयनराजे भोसले यांनी ख्यातनाम चित्रकार डॉ.अष्टपुत्रे यांच्या प्रकृतीची चौकशीही केली. या भेटीने अष्टपुत्रे कुटुंब भारावून गेले.
या वेळी माजी आमदार मदन भोसले, शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर, पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह नायकवडी, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, सौ. पुष्पा पिटके, वंदना कुलकर्णी, सौ.सुचित्रा नायकवडी, रूपाली चौंडे ,विजयराव पिटके आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.अष्टपुत्रे यांनी आपल्या विशेष शैलीत ऐतिहासिक चित्रे, अनेक बारकाव्यांचा अभ्यास करून रेखाटली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या घराण्यावर निष्ठा असल्याने जिजाऊ – शिवराय, बाल शिवाजी, समर्थ रामदास यांच्या अनेक चित्रांचे रेखाटन त्यांनी केले आहे. त्यांनी काढलेली अनेक चित्रे शासकीय कार्यालयांत लावलेली दिसून येतात.













