Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

खांबाटकीच्या बोगद्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात

खांबाटकीच्या बोगद्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात
Ashok Ithape
  • PublishedMarch 21, 2024

भुईंज I महेंद्रआबा जाधवराव

वाईकडून मुंबईकडे जात असताना महामार्गावरील खंबाटकीच्या बोगद्यात वेळे गावानजीक केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या कारला अचानक पणे थांबलेल्या पुढच्या वाहनांच्यावर मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जोरदार आदळल्याने झालेल्या अपघातात केंद्रीय मंत्री ना. आठवले यांच्यासह सर्वजण बचावले परंतु अपघातातील वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी घटनास्थळी समजले.

याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलीसांनी दिलेली माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी सहा वाजनेच्या दरम्यान वाईहून कार्यक्रम उरकून मुंबईकडे रवाना होत असताना वेळे गावानजीक खंबाटकी बोगद्यात बंद पडलेल्या पिकअपला कंटेनरसह इतर चार गाड्या एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात ना. रामदास आठवले यांची हि कार पुढील गाडीवर आदळल्याने मंत्र्यांसह इतर वाहनातील सर्वजन सुखरूप बाहेर पडले. तर घटनास्थळी भुईज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांनी त्यांच्या सहकारी समवेत तातडीने मदत यंत्रणा राववून वाहतुक सुरळीत केली व मंत्र्यांना पर्यायी वाहनाने पुढील प्रवासासाठी रवाना केले.

दरम्यान घटनास्थळी वेळे येथील ग्रामस्थ व्यवसायीक यांनी मदतकार्य करत महामार्ग पोलीस अधिकारी बाजीराव वाघमोडे, गालिंदे यांच्यासह सर्व कर्मचारी हजर होते.

आता तरी बोगद्यात पोलीस मदत केंद्र होणार का..?

खंबाटकीच्या बोगद्यात वारंवार होत असलेले घात अपघात यांची वाढती संख्या रखडणारी वाहतुक व आता तर केंद्रीय मंत्री यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर जिल्हा पोलीस दल बोगदयाच्या सुरुवातीला पोलीस मदत केंद्र कार्यान्विंत करणार का असा सवाल वाहन चालकांच्यातून होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!