Mon, Mar 2, 2026
क्राईम न्यूज

दीड लाख रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी सीजीएसटी सहाय्यक आयुक्त आणि निरीक्षकासह दोन आरोपींना सीबीआयकडून अटक

दीड लाख रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी सीजीएसटी सहाय्यक आयुक्त आणि निरीक्षकासह दोन आरोपींना सीबीआयकडून अटक
Ashok Ithape
  • PublishedMarch 16, 2024

मुंबई, 15 मार्च 2024

तक्रारदाराकडून 1.5 लाख रुपयांची लाच मागताना  आणि ती स्वीकारताना  नवी मुंबईतील बेलापूर  विभाग -1 मधील सीजीएसटी आणि सीएक्सचे सहाय्यक आयुक्त आणि निरीक्षक यांना सीबीआयने आज अटक केली. तक्रारीवरून आरोपी सहाय्यक आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार एका वाहतूक कंपनीचा भागीदार असून त्याला सहायक आयुक्त, सीजीएसटी आणि सीएक्स विभाग-1, बेलापूर आयुक्तालय, नवी मुंबई यांनी जारी केलेली कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली होती. त्यानंतर  तक्रारदाराने 27.12.2021 रोजी आवश्यक कागदपत्रे सादर केली. सेवाकराशी संबंधित कारणे दाखवा नोटीस निकाली काढण्यासाठी आरोपी सहाय्यक आयुक्तांनी तक्रारदाराकडून 6,00,000/- रुपयांची लाच मागितल्याचा आरोप  आहे. वाटाघाटी नंतर आरोपी अधिकाऱ्याने 1,50,000/- रुपयांची लाच  स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम निरीक्षक, सीजीएसटी यांच्यामार्फत देण्याचे तक्रारदाराला
सांगण्यात आले.

सीबीआयने सापळा रचून आरोपी सहाय्यक आयुक्ताच्या वतीने तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना सीजीएसटीच्या या निरीक्षकाला पकडले. या दोघांनाही सीबीआयने अटक केली आहे.

आरोपी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आणि सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी झडती घेण्यात येत आहेत.

अटक केलेल्या आरोपींना संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!